Pune Map
Pune - Khadakwasla Dam

पुणे शहराचे पालकमंत्री म्हणून श्री. अजित पवार यांनी प्रचंड दूरदृष्टी दाखविली आणि शहराच्या पाणी पुरवठ्याच्या संरक्षणासाठी आणि मजबूतीसाठी अनेक उपाययोजना केल्या. जपान सरकारशी समन्वय साधून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमांतर्गत मुळा-मुठा नदीची साफसफाई केली. त्यांनी राष्ट्रवादी पक्षासोबतही काम केले. ज्यात वडगाव शेरी, खराडी, लोहेगाव, विठ्ठलवाडी आणि मुंढवा भागात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे मजबूत जाळे तयार केले आणि दोन मोठ्या पाइपलाइन्सची सुध्दा जोडणी केली. ज्यामध्ये खडकवासला धरणातून १६०० एमएम वारजे जलप्रक्रिया प्रकल्पांपर्यंत आणि पर्वती जलप्रक्रिया प्रकल्पातून कॅम्प वॉटर स्टेशनला २,२०० एमएम पाईपलाईनची जोडणी करण्यात आली.

या सुनियोजित पायाभूत सुविधांमध्ये शहराच्या सांडपाण्याचा १०० टक्के निचरा करण्याची क्षमता आहे आणि मुळा-मुठा नदीला विषारी पदार्थांपासून दूषित होण्यापासून ही प्रतिबंध केला आहे. जलप्रक्रिया प्रकल्पातील पाण्याचा वापर बऱ्याच ठिकाणी पाणी समस्या निवारणासाठी ही केला गेला. उदाहरणार्थ, मुंढवा जॅकवेल प्रकल्प, ज्यामुळे १२६ गावांच्या सिंचनाच्या पाण्याची गरज पूर्ण होण्याची शक्यता आहे, तर भामाआसखेड पाईपलाईन प्रकल्पातंर्गत पुण्यातील पूर्व उपनगरांना सुमारे २.६ टीएमसी पाणी पुरविले जाते.

उत्तम सांडपाणी प्रक्रिया पायाभूत सुविधांसह श्री. अजित पवार आणि पीएमसी यांनी एक अत्यंत यशस्वी घनकचरा वेगळे करणे आणि व्यवस्थापन कार्यक्रम देखील अंमलात आणला आहे. जो घरगुती पातळीवर सुरू करण्यात आला. ज्यामुळे त्यातील नागरिकांचा सहभागही वाढला. त्यांनी विभक्त कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती शक्य करुन दाखवली आणि एका जर्मन कंपनीचा सहयोग घेऊन ई-कचरा प्रबंधन आणि ऊर्जा संवर्धन कार्यक्रम केला आहे. या प्रगतीशील आणि व्यापक गोष्टींनी शहराला लोडशेडिंग आणि वीजपुरवठा खंडनापासून मुक्त केले आहे आणि याबाबत राजकीय विरोधकांनीही त्यांचे कौतुक केले आहे.

श्री. अजित पवार आणि पीएमसीने पुढील तीन दशकांच्या लोकसंख्या वाढीचा सामना करु शकेल अशा एकत्रित सार्वजनिक वाहतूक प्रणालीची रचना केली. सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये सीएनजी वापरावर भर देणे, नवीन उड्डाणपूल, रस्ते, स्कायवॉक्स् आणि पार्किंगची सुविधा निर्माण केली. त्यांच्या या कामामुळे वायू प्रदूषण पातळी कमी होण्यावर आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला. त्यांच्या या यशस्वी कार्याचा दाखला म्हणजे एबीपी माझा या वाहिनीतर्फे पुणे शहराला ‘बेस्ट सिटी: एफिशिएंट ट्राफिक मॅनेजमेंट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भविष्याची गरज ओळखणारे श्री. अजित पवार हे पुणे मेट्रोचेही पुरस्कर्ते आहेत. या मेट्रो प्रकल्पात तीन-मार्गिका असून पुणे मेट्रो शहरानजीकच्या सर्व भागांना एकमेकांशी जोडेल आणि यामध्ये औद्योगिक पट्टा असलेल्या पिंपरी चिंचवडचाही समावेश आहे. ह्या तिन्ही मार्गिका सिविल कोर्ट स्थानकाच्या इथे एकत्रित येण्याची व्यवस्था आहे. श्री. अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड दरम्यानच्या बस रॅपिड ट्रान्सपोर्ट (बीआरटी) मार्गाची सुरूवात केली, जी इंटेलिजंट वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (आयटीएमएस) वर आधारीत आहे आणि ही सेवा दोन्ही क्षेत्रातील वाढत्या सार्वजनिक वाहतुकीच्या गरजेसाठी आवश्यक आहे.

Pune - Industrial
Pune - Infrastructure

श्री. अजित पवार ह्यांनी सार्वजनिक आरोग्य यंत्रणा तयार करण्यातही कटिबध्दता दाखविली. जी अगदी खेडोपाड्यातील समुदायांसाठी सुध्दा सेवा देते. कोणाचाही जीव प्रतिबंधक किंवा आपत्कालीन वैद्यकीय मदतीच्या अभावामुळे दगावू नये, हा त्यामागचा हेतू होता. म्हणूनच त्यांनी विविध दूरवरच्या भागांमध्ये रुग्णालये आणि प्रसूतिगृहे बांधली आहेत आणि आजारांचे लवकर निदान करण्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण केले. ज्यामुळे जीवन दर वाढण्यास प्रोत्साहन मिळाले. त्यांनी स्त्रियांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी शौचालय सुविधा निर्माण करण्यासाठी सुध्दा एक प्रचंड मोहीम हाती घेतली होती. २०१२-१०१५ सालादरम्यान शौचालये बांधण्यात आली. याव्यतिरिक्त, त्यांनी स्त्रियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पाऊल उचलत उंच इमारतींमध्ये पारदर्शी लिफ्ट असणे सक्तीचे केले.

तंत्रज्ञानाचे सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रभाव आपल्या भविष्यातील संभावनांवर आहे. आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचे वारंवार पुर्नमुल्यांकन करणे हे आवश्यक आहे. ज्यामुळे भारतीय युवांना नोकरीच्या बाजारपेठेतील स्पर्धेला तोंड देता येईल. शालेय अभ्यासक्रमात संगीत, कला आणि खेळ यांचा समावेश करण्याला प्रोत्साहन देणे तसेच ई-लर्निंग आणि संगणक साक्षरता सुकर करणे यासाठी श्री. अजित पवार आणि पीएमसी यांनी समग्र शिक्षण आणि आदर्श प्राथमिक शिक्षण कार्यक्रम विकसित करण्याच्या विचारास प्रोत्साहन देत अनेक पावले उचलली. खराडी क्रीडा संकुल, आधुनिक क्रीडा संकुल, पं. भीमसेन जोशी कलामंदिर आणि पं. जवाहरलाल नेहरू संस्कृती भवन अशी अनेक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रे त्यांनी पुणे शहराभोवती उभारली आहेत.

आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था, एमईआरईआर यांनी जगातील "टॉप लिव्हिंग रॅंकिंग २०१४" या सर्वेक्षणात जगातील ८ सर्वात आघाडीच्या सर्वाधिक विकसनशील शहरांपैकी एक म्हणून पुणे शहराला मान दिला. याचे मोठ्या प्रमाणावर श्रेय श्री. अजित पवारांच्या दूरदृष्टी आणि धोरणांना जाते. पुणे शहर हे औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी उदयोन्मुख ठिकाण म्हणून आघाडीवर आहे. खासकरून आयटी आणि ऑटोमोबाइल-संबंधित उद्यमांसाठी विशिष्ट सुविधांचा यात उल्लेख आहे. श्री. अजित पवार आणि पीएमसीने आधीच ओळखले की, आर्थिक प्रगती तर गरजेची आहे, पण त्याबरोबरच दीर्घकालीन टिकाऊ विकास सुनिश्चित करणे म्हणजे पर्यावरण पूरक धोरणे तयार करणेसुध्दा आवश्यक आहे. त्याच अनुषंगाने शहराच्या सर्वसमावेशक कार्बन उत्सर्जनाचा अहवाल प्रकाशित करणारी पीएमसी ही देशातील पहिली महापालिका बनली. कार्बन उत्सर्जन सूचीनुसार, पुणे शहरातील १९ बायोगॅस संयंत्रांमुळे कार्बन उत्सर्जन ५.५८ वेळा कमी प्रमाणात झाले. परिणामी, पुण्याचे दरडोई कार्बन उत्सर्जन १.४६ टन झाले, जे राष्ट्रीय सरासरी १.५ टन पेक्षाही कमी होते. पीएमसी ही देशातील पहिली नगरपालिका आहे, जिथे पर्यावरणपूरक गृहनिर्माण प्रकल्प विकसित केले आणि अशा पर्यावरणास अनुकूल तंत्रज्ञान स्वीकारलेल्या निवासी प्रकल्पांना मालमत्ता करात १० टक्के सवलत सुध्दा दिली. या उपाययोजनांचा ‘अर्थ अवर सिटी चॅलेंज २०१५’ मध्ये विशेष उल्लेख करण्यात आला. श्री. अजित पवार यांनी पुणे शहराला 'ग्रीन सिटी' मध्ये रुपांतरित करण्याचा सफल प्रयत्न केला. त्यांनी ११० सार्वजनिक उद्यानांची लागवड करून एक संयुक्त वन कार्यक्रम तयार केला होता. ज्याने शहरातील हरितपट्टा टिकवून ठेवण्यास मदत होईल आणि या निगडीत इतर अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांना त्यांनी प्रारंभ करुन दिला.

अजित पवार
कॉपीराइट २०२० अजित पवार, सर्व हक्क सुरक्षित
पुन्हा वरती जा