Map of Pimpri Chinchwad
Map of Pimpri Chinchwad

संधीच्या लोंढ्याबरोबर अडथळे सुद्धा येतातच. शहरांच्या वाढीमुळे वाहतूक आणि पायाभूत सुविधांवरील ताण निर्माण होऊ शकतो, हे श्री. अजित पवार यांनी आपल्या दूरदृष्टीने लवकरच जाणले आणि त्यावर उपाययोजना केल्या. नाशिक रोड फ्लायओव्हर, भोसरी फ्लायओव्हर, दापोडी फ्लायओव्हर आणि चाफेकर चौक उड्डाणपुलासह १३०० किलोमीटरचे जाळे हे प्राधान्याने वाहतूक वेगवान करण्यासाठी बांधले. त्याचबरोबरीने स्वतंत्र सायकलिंग आणि पादचारी मार्गदेखील विकसित केले गेले. ह्या रस्त्याचे पुर्ण सुशोभीकरण केले गेले असून प्रचंड प्रमाणात झाडांची लागवडही करण्यात आली आहे. श्री. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे यांना उत्तमरित्या जोडण्यासाठी मेट्रो मार्ग आणि बस रॅपिड ट्रान्सपोर्ट (बीआरटी) दोन्हीची बांधणी केली. ज्यामुळे ह्या औद्योगिक शहरातील वाहतूक सुकर आणि वेगवान झाली.

श्री. अजित पवार यांचे आणखी एक महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क (पीसीएसपी) हे आहे. हे एक अनोखे आणि अनौपचारिक विज्ञान शिक्षण केंद्र आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम (एनसीएसएम) आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने विकसित ह्या सायन्स पार्कची स्थापना केली गेली. या क्षेत्रात उत्कृष्ट समन्वयित विज्ञान संचार आणि लोकप्रियता कार्यक्रम सुरू करण्याच्या प्रयत्नात पीसीएसपी विकसित करण्यात आले. केंद्रस्थानी सुमारे ४००० चौरस मीटर क्षेत्रफळाचे एक क्षेत्र तयार करण्यात आले आहे. तीन कायमस्वरुपी सज्जे, एक तात्पुरता प्रदर्शन हॉल, एक तारामंडल, एक विज्ञान प्रदर्शन क्षेत्र, एक निदर्शन कोन, एक सभागृह, एक थ्रीडी विज्ञान शो सुविधा, लायब्ररी आणि कॉन्फरन्स हॉल, आणि प्रदर्शनांच्या देखभालीसाठी आणि विकासासाठी एक कार्यशाळा बनविण्यात आले आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र याव्यतिरिक्त, पीसीएसपी हे संशोधन आणि विकास केंद्र म्हणूनही कार्यरत आहे. ज्यामुळे क्षेत्रीय विकासासाठी अत्याधुनिक संशोधनाचे कार्य होते आणि नवीन स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळते. कार्यशाळा, डेमो आणि थ्रीडी विज्ञान कार्यक्रमसुध्दा पीसीएसपी आयोजित करते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना सुरूवातीच्या काळातच विज्ञान आणि निगडीत शिक्षणात स्वारस्य निर्माण करण्यात आणि तंत्रज्ञानाच्या जागतिक प्रगतीशी ओळख होण्यास मदत करते.

Pimpri Chinchwad - Cycling Tracks And Pedestrian Walkways
Pimpri Chinchwad - Sarathi Helpline

युवा नागरिक हे नेहमीच श्री. अजित पवारांच्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहेत. परिणामी, पिंपरी-चिंचवड विभागाने शिक्षणाच्या क्षेत्रात ही मोठ्या प्रमाणात यश मिळविले आहे. या शहरात १३५ प्राथमिक शाळा, १८ माध्यमिक शिक्षण शाळा, ७० पेक्षा अधिक खाजगी शाळा आणि काही नामांकित महाविद्यालये आहेत. श्री. अजित पवार यांचा समग्र शिक्षणावर दृढ विश्वास आहे. ज्यामध्ये क्रीडा आणि कला या दोघांचा मेळ आहे. याच विचारातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ११ क्रीडांगण, १४ बॅडमिंटन हॉल, ११ स्विमिंग पूल, ५ टेनिस कोर्ट आणि दुर्गा टेकडीवर एक सुंदर जॉगिंग ट्रॅक विकसित करण्यात आला. तसेच नृत्य, नाट्य आणि संगीत यांना मंच मिळावा म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने चिंचवड येथील प्राचार्य रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर, भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाटयगृह यांची बांधणी केली.

श्री. अजित पवार यांना जाणीव आहे की, प्रभावी सार्वजनिक आरोग्य धोरणांमध्ये प्रतिबंधात्मक आणि उपायात्मक दोन्ही उपाययोजनांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कार्यक्षम कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी उपकरणे उभारण्यासाठी त्यांनी पीसीएमसीमध्ये काम केले. ज्यामुळे प्रक्रिया केलेल्या पाण्याचे पुरेसे पुनर्वितरण करण्याची परवानगी देण्यात आली आणि पाण्यातून पसरण्याऱ्या रोगांच्या फैलावाला आळा बसला. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलच्या (वायसीएमएच) सुधारणा आणि आधुनिकीकरणातही महत्त्वाची भूमिका अजित पवारांनी बजावली.

श्री. अजित पवार यांना विश्वास आहे की, एक कार्यक्षम आणि पारदर्शक सरकार निर्माण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नागरिकांना राजकीय प्रक्रियेत सामील करणे होय आणि त्यांना स्वतःच्या कल्याणासाठी कार्य करण्यास सक्षम करणे. या दृष्टिकोनातून त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिक-केंद्रित ई-गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म आणि सारथी हे दोन क्रांतिकारक उपक्रम सुरु केले. ई-गव्हर्नन्स ह्या उपक्रमात नागरिक मर्यादित वेळेत एकाच ठिकाणी आपल्या समस्येचे निराकरण करु शकतात आणि उपाययोजनांचा पाठपुरावा सुध्दा करू शकतात. ‘द सिस्टम ऑफ असिस्टींग रेसिडन्ट्स’ आणि ‘टुरिस्ट थ्रू हेल्पलाइन इन्फॉर्मेशन’ म्हणजेच “सारथी” हा असा एक उपक्रम आहे, जेथे माहिती ही ‘वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्न (एफएक्यूज)’ या स्वरुपात प्रदान केली जाते. ही माहिती पुस्तक, वेबसाइट, मोबाईल ऍप, ई-बुक आणि पीडीएफ या स्वरुपात असते. या हेल्पलाइनच्या माध्यमातून प्रशासनाच्या सुरु असलेल्या उपक्रम आणि स्थानिक घडामोडी, कर भरणा निगडीत माहिती, चालक परवान्यासाठी अर्ज करणे आणि सरकारी योजनांसाठी नोंदणी करणे यासारखी कामे केली जातात. तसेच निवडून आलेले अधिकारी, आपत्कालीन संपर्क दुवे आणि अशीच बरीच माहिती या उपक्रमातून आपल्याला घेता येते. मदतीची गरज असल्यास प्रकल्पाचा एक भाग म्हणून या परस्पर संवादी हेल्पलाईनवर नागरिक संपर्क करू शकतात.

अजित पवार
कॉपीराइट २०२० अजित पवार, सर्व हक्क सुरक्षित
पुन्हा वरती जा