Maharashtra Map - Garja Maharashtra Majha
Shivaji Maharaj Photo

२०१४ मध्ये श्री. अजित पवार यांनी ओळखले की, दुष्काळ आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतक-यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.

 पिकांचे नुकसान झाल्याने त्यांना वीज बिले भरणे शक्य होत नाही, परिणामी वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. साहजिकच आर्थिक संकटात भर पडते. ह्या समस्येवर तोडगा काढत श्री. अजित पवार यांनी शेतकऱ्यांना थकबाकीतून ५०% सवलत दिली आणि उर्वरित रक्कम तीन सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय दिला.  नंतर त्यांनी जाहीर केले की, राज्याच्या तिजोरीतून ह्यासाठी २,९७७ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. 

श्री. अजित पवारांच्या कार्यक्षमतेचे हे ठळक उदाहरण आहे. अशा रितीने प्रत्यक्ष प्रभाव पडणाऱ्या अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. शिवाय, महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांना अनुदानित कर्ज, खताचा अतिरिक्त साठा करण्यासाठी निधी पुरवठ्याची व्यवस्था केली. तसेच जलक्षेत्रातील सुधारणा, टिकाऊ सिंचन, चारा क्षेत्राच्या विकासासंदर्भातील प्रमुख शेती विकास उपक्रमासंदर्भात राज्य संसाधन निर्देशित केले. 

अजित पवार
कॉपीराइट २०२० अजित पवार, सर्व हक्क सुरक्षित
पुन्हा वरती जा