Map of Baramati
Baramati - Irrigation System

दुष्काळ आणि आजाराच्या पार्श्वभूमीवर एकाच पिकाच्या लागवडीवर अवलंबून राहण्याचा धोका श्री. अजित पवार यांनी ओळखला आणि त्यांनी शेतकऱ्यांना अधिक शाश्वत शेती पद्धती वापरण्याची आणि इतर महसूल स्रोतांमध्ये रुपांतर करण्याचे आवाहन केले. परिणामी, या प्रदेशातील शेतकरी कोरडवाहू शेती, मधमाशी पालन, रेशीम उद्योग, पशुपालन आणि डाळिंब, सीताफळ आणि केळी यांसारख्या उच्च किंमतीच्या फळांचे उत्पादन करु लागले. खरेतर, या क्षेत्रातील बहुतांश शेतकरी आता दुभत्या गायींचे मालक आहेत. ज्यामुळे पिकांच्या नासाडीचा प्रभाव कमी होतो. यामुळे १९७० च्या दशकात २६५ लिटर एवढे असलेले दुधाचे उत्पादन आता वाढले असून आज दिवसाला २,००,००० लिटर एवढे दुग्धउत्पादन होते.

श्री. अजित पवार यांनी क्षेत्रामध्ये एक समृद्ध दुय्यम कृषी अर्थव्यवस्था घडवून आणली. ज्यामुळे शेतक-यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली. आज बारामती हे ऊस, द्राक्षे, ज्वारी, कापूस आणि गहूसारख्या पिकांसाठी प्राथमिक स्त्रोत ठरले असून कापसापासून कपडे आणि धान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि साखरेपासून बनणाऱ्या अनेक वस्तूंचे केंद्र झाले आहे. शिवाय महाराष्ट्रातील वाइन उद्योगाचे मूळ देखील बारामतीमध्येच आहे. द्राक्षांपासून विविध प्रकारच्या वाईन बनवण्यासाठी बारामतीचे हवामान आणि माती योग्य आहे.

श्री. अजित पवार यांनी क्षेत्रातील औद्योगिक विकासाच्या वाढीत ही पुढाकार घेतला. उदाहरणार्थ, बारामतीमधील ८०० हेक्टरचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) औद्योगिक क्षेत्र, ज्यावर अनेक मोठ्या कंपन्या आहेत. उदाहरणार्थ भारत फोर्ज लिमिटेड, गॉडफ्रे फिलिप्स, आयएसएमटी लिमिटेड, केनर्सिझ, श्रेबियर डायनामिक्स डेअरीज लिमिटेड, पियाजियो वाहन प्रा. लि. तसेच प्रसिद्ध बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क लिमिटेड आणि इतर लघुउद्योजकांचा समावेश आहे.

  • Baramati - Vidya Pratishthan's College of Engineering
  • Baramati - Anekant Institute Of Management Studies
  • Baramati - Dr. Babasaheb Ambedkar Stadium
  • Baramati - Vasantrao Pawar Law College
  • Baramati - Vidya Pratishthan Institute Of Information Technology
  • Baramati - Aviation Institute

या प्रदेशातील आर्थिक समृद्धीचे श्रेय हे त्याच्या अभूतपूर्व पायाभूत सोयीसुविधांना जाते. व्यापक आणि प्रकाशमय रस्त्यांचे जाळे, स्वच्छ आणि हरित आच्छादित पादचारी मार्ग, बहुमजली वाहनतळ सुविधा हे सर्व असलेले बारामती हे मोठ्या आणि अधिक विकसित शहरांपेक्षा खूप पुढे आहे. या शहराला निरा नदीवरील तीन धरणांवरून, तसेच उजनी धरणावर नव्याने बांधलेल्या जलशुद्धीकरण कारखान्याद्वारे पाणी मिळते. शहराच्या स्वच्छ वातावरणाचे गुपित त्याच्या व्यापक कचरा संकलन जाळ्यात तसेच कार्यक्षम भूमिगत सांडपाणी प्रणाली आणि उत्कृष्ट सार्वजनिक शौचालय सुविधांमध्ये आहे. नागरी सुविधा, दर्जेदार शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक आरोग्य सुविधा याबरोबरच बारामतीमध्ये क्रीडा आणि मनोरंजनासाठी मोठे स्टेडीयम, ताजे भाज्या आणि मासळीसाठी मंडई, सार्वजनिक उद्याने, वरिष्ठ नागरिकांसाठी बगीचे आणि इतरही बरेच काही आहे.

श्री. अजित पवार यांनी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ही काम केले आहे आणि शहराला अधिक ऊर्जा कार्यक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करून बायोगॅस प्रकल्प बनवले आहेत.

अजित पवार
कॉपीराइट २०२० अजित पवार, सर्व हक्क सुरक्षित
पुन्हा वरती जा