महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात काटेवाडी हे श्री. अजित पवार यांचे गाव आहे. ‘काटेवाडी’ हे श्री. अजित पवार यांच्या दूरदृष्टीपणाचे परिपूर्ण उदाहरण आहे आणि योग्य पाठिंबा असल्यास ते काय साध्य करू शकतात याचेही उत्तम उदाहरण आहे. या भागात त्यांनी केलेल्या कृषी क्षेत्रातील व्यापक कार्यामुळे काटेवाडीला महाराष्ट्राचे पहिले 'इको-व्हिलेज' असे नाव देण्यात आले.

त्यांनी वेळीच ओळखले की, घातक कीटकनाशके आणि खतांचा परिणाम फक्त पर्यावरणावरच नाही, तर लोकांच्या आरोग्यावरही होत आहे. ह्यानंतर त्यांनी काटेवाडीच्या शेती पद्धतींची पुनर्रचना करत सेंद्रिय शेती करण्यावर भर दिला. त्यांनी कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), बारामती यांना सोबत घेऊन रसायनांच्या हानीकारक प्रभावांविषयी जागरुकता निर्माण केली आणि गांडूळखत, हरितखत, जैवखत आणि शेती-टाकाऊ कचऱ्यापासून तयार केलेले कंपोस्ट खत यासारख्या सेंद्रिय पर्यायांचा शेतक-यांना परिचय करून दिला. परिणामी, ह्या उपायांमुळे शेतक-यांना मोठ्या प्रमाणात पीक-उत्पादन मिळाले आणि संपूर्ण गावाने रासायनिक उत्पादने टाळून सेंद्रिय शेतीचा स्वीकार केला. त्यांनी एवढ्यावरच न थांबता जलसंवर्धनाचा उपक्रम सुध्दा अंमलात आणला आणि शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज आणि शेतमालाच्या किंमतीतील चढउतार तात्काळ कळण्यासाठी एक माहिती केंद्र स्थापन केले.

Model Village, Katewadi

काटेवाडी हे आपल्या पायाभूत सुविधांसाठी प्रसिद्ध आहे, तसेच या गावाला महाराष्ट्र शासनातर्फे "मॉडेल व्हिलेज" असे नाव देण्यात आले आहे. ह्या गावात चांगले रस्ते, सौरशक्तीने उर्जित रस्त्यावरील दिवे, बायोगॅस ऊर्जा प्रकल्प, शाळा, प्राथमिक आरोग्यसेवा केंद्र, सामुदायिक गृहनिर्माण प्रकल्प, उच्च क्षमतेची भूमिगत जलनिःसारण व्यवस्था आणि ग्रीन ब्रिज तंत्रज्ञानाद्वारे विकसित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे.

सार्वजनिक स्वच्छतेच्या क्षेत्रात एक अग्रणी असलेले काटेवाडी हे देशातील पहिले गाव आहे. जिथे प्रत्येक घरात शौचालय आहे.

अजित पवार
कॉपीराइट २०२० अजित पवार, सर्व हक्क सुरक्षित
पुन्हा वरती जा