एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील ६० हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या बीएचटीपीएलमध्ये सर्व कपड्यांशी निगडीत बहुतेक सर्व कामे केली जातात. ज्यामध्ये तयार वस्त्र, घरगुती सजावटीसाठी उपयुक्त वस्त्रे, प्रिंटेड कपडे/ बांधणी, वस्त्रांवरील कलाकुसर असे सर्व काही केले जाते. तसेच या आवारात वस्त्रोद्योगाला पूरक असे इतर ही व्यवसाय आहेत. ज्यामुळे येथील अर्थव्यवस्था संपूर्ण कार्यक्षम झाली आहे. दरम्यान, येथील ऑन साइट आर ऍण्ड डी आणि क्वालिटी कंट्रोल सेंटरमार्फत वेळोवेळी बाहेर पाठवल्या जाणाऱ्या उत्पादनांची गुणवत्ता जागतिक दर्जाच्या मानदंडानुसार आहे की नाही, याची खात्री केली जाते. ह्या पार्कमध्ये पर्यावरणास अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच पार्कच्या आवारामध्ये प्लास्टिक, कागदी कपटे यांचा वापर आणि गुटखा/पान सेवनास बंदी घालण्यात आली आहे.

Womens Empowerment, BHTPL
Employment For Women, BHTPL
Employees, BHTPL

बीएचटीपीएल सुरू करण्यामागील प्राथमिक उद्धिष्ट बारामतीच्या आसपासच्या ग्रामीण समुदायातील महिलांसाठी रोजगाराच्या व्यवहार्य स्त्रोताचे निर्माण करणे. आज बीएचटीपीएलमुळे ३००० हून अधिक कुशल, अर्ध-कुशल आणि अकुशल कामगारांना रोजगार मिळाला आहे. ज्यामध्ये ८० टक्के महिला आहेत. याचा या भागातील अर्थकारणावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे अशाखित श्रमबळाच्या गतिशीलतेला चालना मिळाली आणि प्रत्येक कुटुंबाची मिळकत दुप्पट झाली आहे. सध्या बीएचटीपीएलमध्ये ६००० लोक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. यातही पुरुष-स्त्रियांची संख्या समान आहे. यामुळे गतिशीलता सुधारली असून या क्षेत्रातील आर्थिकवाढीचा आलेख ही उंचावत राहील.

Textile Industries, BHTPL

बीएचटीपीएल हे सर्वसमावेशक अस्तित्व आहे. त्यांनी स्थानिक ग्रामपंचायतींच्या सहकार्याने एक प्रभावी नोकरभरती कार्यक्रमसुध्दा विकसित केला. तसेच स्त्रियांना त्यांच्या गावी ये-जा करण्यासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर वाहतुकीची ही सोय करण्यात आली आहे. येथील प्रशिक्षण केंद्र महिलांना मूलभूत व्यावसायिक कौशल्ये शिकवतात आणि त्यांना पार्कमध्येच रोजगार मिळविण्यास मदत करतात. नोकरी करणाऱ्या मातांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या पार्कमध्ये बँकेच्या विस्तारीत शाखा आणि पाळणाघर यांसारख्या सुविधा आहेत.

आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षण, महिलांचे आरोग्य आणि सुरक्षा यासारख्या समस्यांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी देखील बीएचटीपीएल भरपूर कार्यक्रम आयोजित करते.

अजित पवार
कॉपीराइट २०२० अजित पवार, सर्व हक्क सुरक्षित
पुन्हा वरती जा