महाराष्ट्र

श्री. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी तीन दशकांहून अधिक काळ योगदान दिले आहे. यात राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापासून ते अनेक महत्त्वाच्या मंत्रिमंडळ खात्यांचा भार त्यांनी उचलला आहे.

Maharashtra Map - Garja Maharashtra Majha

श्री. अजित पवार यांनी सदैव सुसंगत विकासावर लक्ष केंद्रित केले आणि राज्यात पायाभूत सुधारणांची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १,०५,४९३ कोटी रुपये झाले, तर राज्यातील साक्षरतेचे प्रमाण ८२.९ टक्के, बालमृत्यूचे प्रमाण ४८ टक्क्यावरून २५ पर्यंत घसरले, तसेच ऊर्जा उत्पादन वाढून ८९,४६५ दशलक्ष किलोवॅट/तास झाले. २०१२ सालापर्यंत त्यांनी महाराष्ट्रातील गुंतागुंतीच्या लोडशेडिंग समस्येचे जवळपास निराकरण केले.

सामान्य नागरिकांना उपयुक्त ठरणाऱ्या बॉम्बे स्टॅम्प कायद्यातील सुधारणा असोत वा अनेक प्रगतीशील सब्सिडीसह औद्योगिक विकास करणे असो वा शेतकरी आणि मच्छीमारांच्या उन्नतीकरणासाठी योजना राबविणे. त्यांच्या प्रत्येक सामाजिक-आर्थिक धोरणातून अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्राला नेहमीच फायदा झाला आहे.

Shivaji Maharaj Photo

२०१४ मध्ये श्री. अजित पवार यांनी ओळखले की, दुष्काळ आणि गारपीट यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतक-यांच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. पिकांचे नुकसान झाल्याने त्यांना वीज बिले भरणे शक्य होत नाही, परिणामी वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. साहजिकच आर्थिक संकटात भर पडते. ह्या समस्येवर तोडगा काढत श्री. अजित पवार यांनी शेतकऱ्यांना थकबाकीतून ५०% सवलत दिली आणि उर्वरित रक्कम तीन सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय दिला.  नंतर त्यांनी जाहीर केले की, राज्याच्या तिजोरीतून ह्यासाठी २,९७७ कोटी रुपये खर्च करण्यात येतील. 

Maharashtra Development

श्री. अजित पवारांच्या कार्यक्षमतेचे हे ठळक उदाहरण आहे. अशा रितीने प्रत्यक्ष प्रभाव पडणाऱ्या अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. शिवाय, महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांना अनुदानित कर्ज, खताचा अतिरिक्त साठा करण्यासाठी निधी पुरवठ्याची व्यवस्था केली. तसेच जलक्षेत्रातील सुधारणा, टिकाऊ सिंचन, चारा क्षेत्राच्या विकासासंदर्भातील प्रमुख शेती विकास उपक्रमासंदर्भात राज्य संसाधन निर्देशित केले. 

Maharashtra - Marine Drive in Mumbai

शेतीक्षेत्रातल्या कामाबद्दल तर श्री. अजित पवार यांची महती आहेच, परंतु इतर विविध क्षेत्रात सुध्दा ते प्रगतीशील राहिले आहेत.  त्यांनी मासेमारी क्षेत्रात बंदर विकासासाठी, मासेमारीच्या नौका यंत्रणा आणि महाराष्ट्राच्या समुद्री अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मासेमारीचा प्रचार आणि विपणन करण्यावर भर दिला आहे. त्यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रातील वीज निर्मितीसाठी ऊर्जा सबसिडी, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि 'क' श्रेणी नगरपरिषदेमध्ये रोजगार हमी योजनेचा विस्तार केला.

सार्वजनिक आरोग्याचे पुरस्कर्ता श्री. अजित पवार यांनी २०१२ मध्ये महाराष्ट्रातील गुटखा, पान मसाला आणि अन्य तंबाखुशी संबंधित उत्पादनांवर बंदी घालण्यात योगदान दिले. त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात एआयसीडीच्या हृदयरोपण यंत्र, अपंगांसाठी कमी व्याज दराने ब्रेल घड्याळ आणि वाहनांवरील व्हॅट रद्द केला.  तसेच, तांदूळ कोंडा, हातपंप आणि पाणी मीटरला करमुक्ती दिली. त्यांनी जीवनावश्यक वस्तू, सुकामेवा आणि चहावरील करात ही सवलत सुरू केली, ज्यामुळे कमीतकमी वेतनातही खालच्या सामाजिक-आर्थिक वर्गाला त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करता येईल.

गेल्या तीन दशकांपासूनचा त्यांचा आलेख आपल्या मतदारसंघाकडे असलेले समर्पण आणि कामाप्रती असलेली दूरदृष्टी अधोरेखित करतो.  नोव्हेंबर २०१० ते ऑक्टोबर २०११ या कालावधीत २,८०० पैकी त्यांच्याजवळ फक्त ९ प्रलंबित फाईल्स होत्या. इतर सर्व फाईल्स त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. भारतीय प्रशासकीय संदर्भात हे अभूतपूर्व कार्य आहे, जे त्यांच्या अनुकंपा, चातुर्य, कार्यक्षमता आणि राजकीय कौशल्य यांचे स्पष्ट संकेत आहेत.

अजित पवार
कॉपीराइट २०१८ अजित पवार, सर्व हक्क सुरक्षित