‘विद्या प्रतिष्ठान’ हा बारामतीचा अभिमान आहे आणि भवितव्यासाठी आनंददायक आहे, जे श्री. शरद पवार आणि श्री. अजित पवार यांच्या संकल्पनेतून साकारले आहे. विद्या प्रतिष्ठान सर्व सामाजिक-आर्थिक स्तरांमधील मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी वचनबध्द आहे आणि ग्रामीण युवकांना सामान्य आणि तांत्रिक शिक्षणाद्वारे सामर्थ्य प्रदान करते. एकेकाळी उजाड आणि खडकाळ असलेल्या १५६ हेक्टरच्या जमिनीवर आज विद्या प्रतिष्ठानचा सुंदर परिसर पसरला आहे आणि दररोज सुमारे २३ हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात.

ह्या परिसरात २५ वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था आहेत. जिथे प्रत्येक क्षेत्रातील कुशल विद्वान त्यांचे योगदान देत आहेत. प्रत्येक संस्थेत संबंधित पुस्तके, नियतकालिके आणि जर्नल्सने भरलेली स्वत:ची वाचनालये आहेत. तसेच नवीन आणि परस्परसंशोधन पद्धतींच्या प्रशिक्षणासाठी एलसीडी प्रोजेक्टरची सोय असलेली सभागृह आहेत.

Vidya Pratishthan - Technical Education
Vidya Pratishthan - Educational Institutions
Vidya Pratishthan - Empowers Rural Youth

विद्या प्रतिष्ठानातील जनवास्तू संग्रहालय हे एक असे संग्रहालय आहे, जे श्री. शरद पवार यांच्या प्रेरणादायी जीवन आणि कार्याला समर्पित आहे. तसेच विद्यार्थ्यांना आनंद घेता येईल अशा ऐतिहासिकदृष्ट्या प्रासंगिक छायाचित्रणांचा मोठा संग्रह आहे. दिवसभर काम करून थकल्यावर विश्रांती घेण्यासाठी विद्यार्थ्यांकरिता खास हिरवेगार आणि सुंदर ‘नक्षत्र’ उद्यानदेखील आहे.

पर्यावरणाची जाणीव असलेल्या विद्या प्रतिष्ठान संस्थेत विद्यार्थ्यांना चांगल्या जीवन पद्धतीचा परिचय पहिल्या दिवसापासून करून दिला जातो. परिसरातील हिरवळ जतन करण्यासाठी पुनर्नवीकरण केलेले पाणी वापरतात आणि इथे जलसंवधर्नातून दररोज ३-५ लाख लिटर पाणी गोळा करून १ लाख लिटर पाण्याचे गाळप केले जाते. शिवाय इथे सुरु करण्यात आलेल्या गांडूळखत उपक्रमाने परिसरातील मातीची सुपीकता वाढविण्यात आणि मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा निचरा करण्यास मदत केली आहे.

या क्षेत्रातील विद्या प्रतिष्ठानच्या उपस्थितीने आजूबाजूच्या परिसरातील समुदायांच्या मनोवृत्ती आणि आकांक्षा वाढल्या आहेत. प्रत्येक मुलाच्या प्रगतीचे चक्र यामुळे निरंतर सुरू राहील यात शंका नाही.

अधिक माहिती: www.vidyapratisthan.com

अजित पवार
कॉपीराइट २०१८ अजित पवार, सर्व हक्क सुरक्षित