श्री. अजित पवार यांच्या राजकीय विचारसरणीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रेरणास्त्रोत अध्यक्ष श्री. शरदचंद्रजी पवार म्हणजेच त्यांचे काका ह्यांचा प्रभाव दिसून येतो. जे स्वतः ही उत्तम शासक आहेत. श्री. अजित पवार यांच्या मते उत्तम शासकाचा जन्म हा तऴागळातल्या जनतेच्या समस्या आणि गरजा जाणून होतो, फक्त मतलबाचे राजकारण करुन होत ऩाही. नागरिकांकडून येणाऱ्या सूचना आणि संकल्पनांना त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना जनतेच्या सामाजिक-आर्थिक प्राधान्यक्रमांना समजून विविध योजना राबविणे सोपे झाले. या अनुभवामुळे त्यांना पक्षपातळीवर तसेच संपूर्ण राज्य पातळीवर धोरणात्मक उद्दिष्ट निश्चित करण्यास आणि संसाधने लावण्यास मदत झाली.